फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

देशातील टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती अवाच्या सवा केल्याने सर्वसामान्य ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत. मोबाईल रिचार्जच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. परंतु 2025 वर्ष उजाडायच्या आधीच ट्रायने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या दूरसंचार कंपन्यांना व्हाईस कॉलिंग आणि एसएमएससाठी दोन स्वतंत्र प्लान जारी करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे, असे ट्रायने म्हटले आहे. तसेच रिचार्ज कूपनवरील 90 दिवसांची मर्यादा हटवून 365 दिवसांपर्यंत वाढवली आहे. ट्रायच्या या निर्देशानंतर टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना आता व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस पॅकिंगचा स्वतंत्र पर्याय द्यावा लागेल. अनेक यूजर्स फक्त कॉलिंग वापरतात. त्यांना एसएमएसची गरज नसते. परंतु कंपन्या ग्राहकांकडून डेटा पॅकसोबत कॉलिंग आणि एसएमएसच्या रिचार्जचे पैसे वसूल करते. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महाग होतात.

रिचार्ज 25 टक्क्यांनी महाग

टेलिकॉम कंपन्यांनी या वर्षी जुलैमध्ये रिचार्जच्या किमती 25 टक्क्यांनी वाढवल्या. जिओच्या 239 रुपयांच्या प्लानची किंमत 299 रुपये तर एअरटेलचा 179 रुपयांचा प्लान 199 रुपयांवर पोहोचला. वार्षिक प्लानमध्ये किमान 300 ते 400 रुपयांची वाढ कंपन्यांनी केली.

डेटाशिवाय रिचार्ज प्लान

शहरी भागात स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना घरात वायफाय असल्यामुळे इंटरनेटची गरज कमी असते. तर ग्रामीण भागात अनेक ग्राहकांना फक्त कॉलिंक आणि मेसेजिंगची गरज असते. परंतु टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सक्ती केली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;