अक्कलकोट नगरपालिकेचा गलथान कारभार, लाखो रुपयांची फिरती शौचालये वापराविना पडून

अक्कलकोट नगरपालिकेचा गलथान कारभार, लाखो रुपयांची फिरती शौचालये वापराविना पडून

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमी वर्दळ असते. सण, उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक असतात. भाविकांना पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी लाखो रुपयांची फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली. परंतु, वापराविना ही फिरती शौचालये एकाच ठिकाणी थांबून देखभालीअभावी नष्ट होत आहेत.

अक्कलकोट तीर्थक्षेत्री दिवसेंदिवस येणाऱ्या स्वामिभक्तांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने भाविकांसाठी प्रसाधनगृहे, वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. येथे भाविकांसाठी फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली. त्यासाठी वेळोवेळी लाखो रुपये खर्च केले आहेत.  मात्र, अनेक फिरती शौचालये वापराविना एकाच जागेवर धूळखात पडून असल्याने ती निकामी झाल्याचे दिसत आहेत. नगरपालिकेच्या जुना दवाखाना आवारात देखभाल व दुरुस्तीअभावी निकामी झालेली फिरती शौचालये व नवीन फिरती शौचालये वापराविना एकाच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा होणारा खर्च टाळावा आणि येथे कायमस्वरूपी शौचालये बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करावीत, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

“अक्कलकोट नगरपालिकेच्या जुन्या दवाखानाच्या आवारात अनेक फिरती शौचालये तशीच पडून असल्याने ती सडून निकामी झाली आहेत. या शौचालयांसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. नवीन फिरती शौचालयेही येथेच ठाण मांडून थांबली आहेत. त्यामुळे शहरातील विविध मंदिर परिसरात कायमस्वरूपी शौचालये ही बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात यावीत –  वसंत देडे, समाजसेवक, अक्कलकोट

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;