सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ

सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ

भाजपप्रणीत छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजने’चा लाभ चक्क सनी लिओनी घेत होती अशी माहिती समोर आली आहे. या योजनेची लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर पैसे पाठवण्यात आल्याचे उघड झाले असून या संपूर्ण प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.  कथितरीत्या छत्तीसगड येथे सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडण्यात आले होते. या खात्यात विवाहित महिलांना ‘महतरी वंदन’ या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे एक हजार रुपये पाठवले जात होते.

राज्यातील सत्ताधारी भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या जाहिरनाम्यात या योजनेची घोषणा केली होती. या सर्व प्रकाराची आता बस्तर जिल्हा प्रशासन चौकशी करत आहे. ‘महतरी वंदन’ योजनेच्या संकेतस्थळावर चाचपणी केली असता संबंधीत फाइलमध्ये लाभार्थी म्हणून सनी लिओनी आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;