वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…

वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सहून गोव्याच्या मडगाव स्थानकाकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस चक्क रस्ता चुकली आहे. देशातील सर्वात अतिजलद आणि अत्याधुनिक ट्रेन म्हणून वंदे भारतची ओळख आहे. ही ट्रेनच रस्ता चुकल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

ही ट्रेन सीएसएमटीहून गोव्याला निघाली होती. मात्र, रस्ता चुकल्याने ती कल्याणला पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्या रखडल्या होत्या. तर वंदे भारतही नियोजित वेळेपेक्षा 90 मिनिटे उशाराने मडगावला पोहचली आहे.

सीएसएमटी पासून गोव्याच्या मडगाव स्थानकादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाते. ठाण्यामध्ये ही ट्रेन रस्ता चुकली ती दिवा स्थानकातून पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेनं पुढे गेली. मात्र, चूक लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने या वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबवले. काही वेळानं ती पुन्हा एकदा गोव्याच्या दिशेनं रवाना झाली, रस्त्या चुकल्यामुळे या ट्रेनला मडगाव स्टेशनला पोहोचण्यासाठी तब्बल 90 मिनिटं उशिर झाला.

या ट्रेनला निर्धारीत मार्गानं दिवा स्थानकातून पनवेलकडे जायचे होते. मात्र ती कल्याणच्या दिशेनं पुढे गेली. ही घटना सकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या आसपास घडली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार सिग्नल यंत्रणेमध्ये निर्माण झालेल्या गडबडीमुळे झाला.दिवा जंक्शनच्या डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनमधध्ये असलेल्या एका सिग्नलमध्ये आणि दूरसंचार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता,अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;