वायंगणी येथे चोरट्यांची वृद्ध दामप्त्याच्या घरात घुसून चोरी, पाच तोळ्याचा ऐवज लंपास

वायंगणी येथे चोरट्यांची वृद्ध दामप्त्याच्या घरात घुसून चोरी, पाच तोळ्याचा ऐवज लंपास

वायंगणी येथे मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर (77) आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर (70) यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ च्या सुमारास वायंगणी देवूळवाडी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते.

दामोदर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तुलशीवृदांवनास अगरबत्ती लावून घरात येत असताना दोन अज्ञातांनी सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसले. त्यांनी दामोदर साळकर यांचे रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्याने साळकर यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील तीन चेन मागून ओढून पळ काढला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर व गळ्याला जखम झाली ‌तर दुसऱ्या चोरट्याने सुप्रिया दामोदर साळकर यांच्या गळयातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. मंगळसूत्र व तीन चेन खेचून साळकर यांचे सुमारे पाच तोळ्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला असल्याचे साळकर यांनी सांगितले.

हे चोरटे काळ्या स्प्लेंडर वरुन आले होते. तसेच त्यापैकी एक जाडा आणि एक किरकोळ शरीरयष्टीचा असल्याचे त्यांना पाहिलेल्या वायंगणी येथील बापु सावंत यांनी सांगितले.चोरीची माहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि सागर खंडागळे पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, सुदेश तांबे, महिला पोलीस तांबे, मनोज पुजारे यांसह सरपंच रुपेश पाटकर, सदा राणे,चंदू सावंत,सचिन रेडकर यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;