अर्जुनसोबतच्या ब्रेकअपवर अखेर मलायकाने सोडलं मौन; पहिल्यांदाच सांगितलं कारण?

अर्जुनसोबतच्या ब्रेकअपवर अखेर मलायकाने सोडलं मौन; पहिल्यांदाच सांगितलं कारण?

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी ही एक जोडी होती. वयातील अंतर आणि ट्रोलिंगला न जुमानता मलायका आणि अर्जुनने जाहीरपणे एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं होतं. आता ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे मलायकाने अप्रत्यक्षपणे अर्जुनसोबतच्या ब्रेकअपमागचं कारण सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 2018 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. सुरुवातीला दोघांनी आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्जुनच्या एका वाढदिवशी मलायकाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रयत्न हे प्रेमासाठी ऑक्सिजनप्रमाणे असतं. त्याशिवाय प्रेमातील आग विझून जाते’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. या पोस्टचा अर्थ हाच आहे की प्रेमात आपल्या जोडीदारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय ते नातं टिकत नाही. मलायकाने अर्जुनसोबतच्या ब्रेकअपच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट लिहिल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. कदाचित प्रयत्न कमी पडल्यानेच या दोघांचं नातं संपुष्टात आलं असावं, अशी शक्यता नेटकरी व्यक्त करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा होत्या. अशातच ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर करत ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर मलायकानेही नोव्हेंबर महिना सुरू होताच ”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता. मलायकासोबत पुन्हा पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या पॅचअपची शक्यता वर्तवली होती. मात्र अर्जुनने आता सिंगल असल्याचा खुलासा केल्याने मलायकासोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;