नाताळनिमित्त गावी जात असतानाच काळाचा घाला, कंटेनर कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नाताळनिमित्त गावी जात असतानाच काळाचा घाला, कंटेनर कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नाताळच्या सुट्टीनिमित्त गावाकडे जात असतानाच एका कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला. गावी पोहचण्याआधीच एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत झाला. बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कारवर कंटेनर पलटल्याने कारमधील आयटी इंडिनिअरसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई, गण, दिक्षा, आर्या, विजयालक्ष्मी अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी आहेत. चंद्रम इगाप्पागोळ हे बंगळुरूत एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते. यामुळे ते कुटुंबासह बंगळुरूत राहत होते.

नाताळच्या सुट्टीनिमित्त सर्व कुटुंब मूळगावी येत होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तळकेरेजवळ एक कंटेनर कारवर पडला. यात कारचा चक्काचूर होऊन कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;