चाहत्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा संपणार, बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार

चाहत्यांची 18 वर्षांची प्रतीक्षा संपणार, बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार

आपल्या सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे पडद्यावर येतात आणि जातात आणि त्या चित्रपटांची चर्चा देखील जास्त होत नाही. त्यात काही चित्रपट असे असतात ज्यांच्या रिलीजनंतर चित्रपट पाहिल्यावर लोक दिवसरात्र त्यावर चर्चा करताना दिसतात. त्यानंतर त्या चित्रपटाचा पुढचा भाग येण्याची वाट पाहतात. अश्यातच आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो असाच एक चित्रपट आहे. ज्याच्या तिसरा भाग प्रदर्शित होण्याची लोकं खूप वाट पाहत आहेत. तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. हा चित्रपटच मजेदार तर आहेच, शिवाय विशेष प्रतीक्षा ही क्लायमॅक्स सीनची असणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टचा शेवट एवढ्या रोमांचक वळणावर झाला की प्रेक्षक तो सीन कधीच विसरू शकणार नाहीत. आणि इतक्या वर्षांनंतरही त्या वेळेस नेमकी काय घडले हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.

कोणता आहे हा चित्रपट आणि त्यातील शेवटचा सीन?

१८ वर्षांपासून प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असलेला चित्रपट तो म्हणजे फिर हेरा फेरी. हा चित्रपट हेराफेरी चित्रपटाचा सिक्वेल होता. तसेच तुम्हा सगळ्यांना या चित्रपटाचा शेवटचा सीन कोणता होता हे नक्कीच आठवत असेल. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये अक्षय कुमार एका पुलाच्या कठड्यावर अडकलेला दिसत आहे. कारण या सीनमध्ये परेश रावल व सुनील शेट्टी यांनी अक्षय कुमारला फोन करताना दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमार हा पुलाच्या कठड्यावर फोन उचलनाच्या नादात तर दुसरीकडे हातात असलेलं सामान पुलाच्या खाली वाहत्या पाण्यात पडू नये यासाठी होणारी कसरत यात दिसत आहे. सामान वाचवण्याच्या नादात फोन थेट पाण्यात पडेल की हातातले सामान याचा व त्यानंतर काय होईल याचा खुलासा चित्रपटाच्या तिसऱ्या भागातच होणार आहे.

तिसऱ्या भागाची तयारी जोरात

फिर हेरा फेरी या चित्रपटाचा तिसरा भाग २०२५ मध्येच प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, असरानी आणि गुलशन ग्रोव्हर सारखे कलाकारही होते. तर २००६ साली हेरा फेरी 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात मुख्य कलाकारांव्यतिरिक्त जॉनी लिव्हर, बिपाशा बसू आणि रिमी सेन देखील दिसले होते. तर येणाऱ्या आगामी चित्रपटात नेमकी काय घडणार आहे. याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाचा तिसरा पार्ट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;