लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाची बस ताम्हणी घाटात कोसळली, 5 ठार; 13 प्रवासी जखमी

लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाची बस ताम्हणी घाटात कोसळली, 5 ठार; 13 प्रवासी जखमी

लग्नाला चाललेली वऱ्हाडाची बस ताम्हणी घाटात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात पाच प्रवासी ठार झाले असून, 12 ते 13 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळते.

बसमध्ये एकूण 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. सर्वजण पुण्यातील चाकण येथून महाडला लग्नासाठी चालले होते. यादरम्यान ताम्हणी घाटात काळाने झडप घातली आणि वऱ्हाडाची बस दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;