लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल; देवेंद्र फडणवीस यांच्या अजित पवारांना शुभेच्छा

लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल; देवेंद्र फडणवीस यांच्या अजित पवारांना शुभेच्छा

अजितदादा लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनपर प्रस्तावावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या इच्छेवर फुंकर घातली. अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अजितदादा यांचे समर्थक नेहमीच भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव समोर करत असतात. मात्र पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर झाला आहे.

महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे हा विषय अनेकदा चर्चेत आला आहे. राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवणारी व्यक्ती कधी महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकलेली नाही, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होती त्यामुळे अजित दादा हे पर्मनंट उपमुख्यमंत्री असे टोमणे देखील लगावले जात आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पुढे जाऊन राज्याचा मुख्यमंत्री बनू शकत नाही. असा संकेत खोटा ठरला. त्यामध्ये आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देत. लोक तुम्हाला पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात पण तुम्ही एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री व्हाल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;