हिंदुस्थानातील अंड्यांची आयात ओमानने रोखली, तामीळनाडूतील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का

हिंदुस्थानातील अंड्यांची आयात ओमानने रोखली, तामीळनाडूतील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का

ओमानने हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या अंड्यांना नवीन परवाना देणे बंद केले आहे. यामुळे तामीळनाडूतील नमक्कल येथील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच कतारने हिंदुस्थानातील अंड्यांच्या वजनाबाबत काही अटी ठेवल्या होत्या. आता कतारने नवीन परवाना देणे थांबवले आहे.

डीएमकेचे खासदार केआरएन राजेश कुमार यांनी मंगळवारी राज्यसभेत हा  मुद्दा उपस्थित केला. देशातून अंड्यांची आयात पुन्हा सुरू करावी म्हणून केंद्र सरकारने कतार आणि ओमानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी राजेश कुमार यांनी केली.

याविषयी राजेश कुमार म्हणाले, मी पोल्ट्री शेतकरी आणि अंड्यांच्या निर्यातीत येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानात ओमान आणि कतारच्या राजदूतांसोबत बैठक घेण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी नमक्कलचे अंडी निर्यातदार, पशुधन आणि कृषी शेतकरी – व्यापारी संघटनेचे सरचिटणीस पी.व्ही. सेंथल यांनी ओमानच्या बंदीमुळे 15 कोटी रुपयांची मोठी खेप अडकल्याचे सांगितले. आकडेवारीनुसार या वर्षातील सुरुवातीला ओमान, कतार, दुबई, अबुधाबी, मस्कट, मालदीव आणि श्रीलंकासह विविध देशांत 11.4 कोटी अंडे निर्यात करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;