कॉन्टेन्ट क्रिएटर्स सावधान! आता ‘असे’ व्हिडीओ अपलोड केल्यास YouTube करणार कारवाई

कॉन्टेन्ट क्रिएटर्स सावधान! आता ‘असे’ व्हिडीओ अपलोड केल्यास YouTube करणार कारवाई

यूट्यूब कॉन्टेन्ट क्रिएटर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यूट्यूब आता अशा कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे जे, दिशाभूल करणारे टायटल किंवा क्लिकबेट थंबनेल वापरून व्हिडीओ अपलोड करतात. याबाबत स्वतः यूट्यूबनेच माहिती जाहीर केली आहे.

कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हिडिओच्या मजकुराशी जुळत नसलेल्या व्हिडीओंच्या टायटल किंवा थंबनेल असणाऱ्या कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर कारवाई केली जाईल. ही कारवाई विशेषतः ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींशी संबंधित व्हिडीओंवर करण्यात येईल, असं कंपनीने म्हटलं आहे.

थंबनेल व्हिडिओशी संबंधित असणे आवश्यक

YouTube ने म्हटले आहे की, सनसनाटी किंवा दिशाभूल करणारे टायटल आणि थंबनेल व्हिडीओ पाहणाऱ्यांची दिशाभूल करतात. यातच ब्रेकिंग न्यूज आणि चालू घडामोडींवर व्हिडिओ बनवणाऱ्या हिंदुस्थानी कॉन्टेन्ट क्रिएटर्सवर यूट्यूबची करडी नजर असणार आहे.

काय होऊ शकते कारवाई?

कारवाईबद्दल माहिती देताना, YouTube ने सांगितले की, जे क्रिएटर्स दिशाभूल करणारे टायटल किंवा थंबनेल बनवून व्हिडीओ अपलोड करतील, त्यांचे व्हिडीओ यूट्यूबवरून हटवले जातील. क्रिएटर्सला नियम समजण्यासाठी सर्वातआधी हे पाऊल उचलले जाणार आहे. यानंतर चॅनल ब्लॉकही केले जाऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;