16 व्या वर्षीच घर सोडलं,विवाहित अभिनेत्रीसोबत अफेअर; आता आहे बॉलिवूडचा चॉकलेट हीरो

16 व्या वर्षीच घर सोडलं,विवाहित अभिनेत्रीसोबत अफेअर; आता आहे बॉलिवूडचा चॉकलेट हीरो

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यातील काही यशस्वी होतात काही नाही. या स्ट्रगलमध्ये काही स्टार किड्सची नावेही समोर आली आहेत. एक असाच अभिनेता आहे ज्याला आज बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणतात. पण त्याचा स्ट्रगल कौतुकास्पद आहे.

या अभिनेत्याने  आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच घर सोडलंलह होतं. आज त्याचे स्वप्न पूर्ण झालं असून बॉलिवूडमध्ये तो एक नावा-रुपाला आलेला अभिनेता आहे. आज त्याची खूप जास्त लोकप्रियता आहे.

हा अभिनेता आहे हर्षवर्धन राणे. हर्षवर्धनची आई तेलुगू आणि वडील मराठी. सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या या मुलाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी 16 वर्षी घर सोडून त्याला मुंबईत यावं लागलं. त्यानंतर 2008 मध्ये त्याने ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये छोटी भूमिका साकारली होती.

2010 मध्ये त्याने तेलुगू सिनेोमात प्रवेश केला. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या त्याच्या ‘सनम तेरी कसम’ या हिंदी सिनेमामुळे त्याचं नशीबच पालटलं. चाहत्यांच्या मनात तसेच बॉलिवूडमध्ये त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. हा सिनेमा आणि यातील गाणे आजही तरुणाईचा सर्वात आवडती आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ सिनेमाची ऑफर मिळाली होती. पण त्याने ती नाकारली. कारण त्याला खलनायकाची भूमिका साकारायची नव्हती. मात्र नंतर त्याला या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. भन्साळींच्या सिनेमात काम करणं करिअरसाठी फायदेशीर होतं हे त्याला नंतर पटलं. हर्षवर्धनने ‘हसीन दिलरुबा’, ‘तारा व्हर्सेस बिलाल’ हे सिनेमे केले.

विवाहित अभिनेत्रीसोबत डेटिंग

हर्षवर्धन वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला होता. ‘मोहोब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र त्यांचा ब्रेकअप झाल्याचेही बोलले जाते. नंतर अभिनेत्री संजीदा शेखसोबत त्याचं नाव जोडलं गेलं.  तेव्हा संजीदा विवाहित होती. या नात्यामुळे हर्षवर्धनच्या आयुष्याबद्दल खूपच चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र दोघांनीही हे नात कधीच स्वीकारलं नाही.

दरम्यान हर्षवर्धनने बॉलीवूडप्रमाणेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  हर्षवर्धनने नुकताच 41 वा वाढदिवस साजरा केला. इंडस्ट्रीत गॉडफादर किंवा कनेक्शनशिवाय, त्याने स्वत: साठी शोधलेल्या यशाच नक्कीच कौतुक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;