गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट बुडाली; प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल, JNPT, तटरक्षक दलाचे प्रयत्न
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा येथे जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जाणारी नीलकमल या प्रवासी बोटीची दुसऱ्या बोटीला धडक झाली आणि त्यामुळे उरण, कारंजा येथे बोट बुडाली आहे. बोटीमध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast Guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. काही प्रवाशांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढून गेट वे ऑफ इंडिया येथे आणण्यात आले आहे. अधिक चौकशी पोलीस करत आहेत.<
गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली, प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल, JNPT, तटरक्षक दलाचे प्रयत्न#mumbai pic.twitter.com/O9xFEzTlrT
— Saamana Online (@SaamanaOnline) December 18, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List