अत्यंत दयनीय अवस्था, HC च्या निवृत्त न्यायाधिशांना फक्त 10 ते 15 हजार रुपये पेन्शन; सुप्रीम कोर्ट नाराज

अत्यंत दयनीय अवस्था, HC च्या निवृत्त न्यायाधिशांना फक्त 10 ते 15 हजार रुपये पेन्शन; सुप्रीम कोर्ट नाराज

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना मिळणाऱ्या पेन्शनवरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. निवृत्त न्यायाधिशांना केवळ 10 ते 15 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. ही अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान म्हटले आहे.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या पेन्शन प्रकरणाशी संबंधित दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. काही प्रकरणांमध्ये मानवतावादी दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे, असे सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले. सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी खंडपीठाला जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले आहेत.

तुम्ही सरकारला समजावून सांगितले तर बरे होईल, आमचा हस्तक्षेप टाळावा. या प्रकरणाचा विविध प्रकरणांच्या आधारावर निर्णय घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना लागू होईल, असे खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;