आप मेरेको मरवाओगे..असे म्हणत थांबला रोहित शर्मा…नेमके काय झाले पत्रकार परिषदेत….

आप मेरेको मरवाओगे..असे म्हणत थांबला रोहित शर्मा…नेमके काय झाले पत्रकार परिषदेत….

ब्रिस्बेनच्या गाबा कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एका वाक्यानंतर रोहित शर्मा अचानक थांबला. आप मेरेको मरवाओगे यार… असे म्हणत आपण सद्यस्थितीबाबत बोलत असून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, असे स्पष्ट केले. नेमके रोहित काय म्हणाला आणि त्याच्या या वाक्यानंतर पत्रकार परिषदेत हशां निर्माण झाला. त्यानेही आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, असे सांगत आपल्याला काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट केले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या बाजूला बसून आर. अश्विन याने प्रसारमाध्यमांसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अ‍ॅडिलेड कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना ठरला. अश्विनच्या निवृत्तीवर भाष्य करताना रोहित शर्मानं आम्ही चांगले मित्र आहोत. तो ड्रेसिंग रुममध्ये नसला तरी यापुढेही आम्ही एकमेकांना भेटत राहू, आमची मैत्री कायम राहील, असे त्याने म्हटले आहे.

ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे आणि पुजाराच्या नावाचा उल्लेख करत रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही मुंबईत बऱ्याचदा अगदी सहज भेटतो. पुजारा राजकोटमध्ये लपून बसलेला असतो. मात्र, क्रिकेट मैदानावर आमची कुठं ना कुठं भेट होत असते. अश्विनही पुढचे एक दोन वर्षे आपल्यासोबत असेल, याची खात्री आहे. त्यामुळे आपण त्याला भेटत राहू. अश्विन हा एक मॅच विनर प्लेयर होता. त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे निश्चितच त्याची उणीव भासेल.

यावेळी रोहितने पुजारा-अजिंक्य रहाणे यांच्या नावाचा दाखला दिला. ही मंडळी माझ्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला दिसणार नाहीत. असे बोलता बोलता रोहित अचानक थांबला. ‘आप लोग मुझे मरवावोगे यार…’ असं म्हणत त्याने अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनी निवृत्ती घेतलेली नाही, ही गोष्ट स्पष्ट मांडली. आता ते माझ्या डाव्या किंवा उजव्या बाजूला नाहीत, असे त्याने स्पष्ट केले. याचा वेगळा अर्थ लावला जाऊ नये. अश्विननं अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली आहे, असे सांगताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी आजही टीम इंडियाचे दरवाजे खुले आहेत, असे रोहित शर्मा म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;