मुस्लिम असून जन्मकुंडलीवर विश्वास ठेवतात सलीम खान, ‘त्या’ 4 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यानंतर…

मुस्लिम असून जन्मकुंडलीवर विश्वास ठेवतात सलीम खान, ‘त्या’ 4 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यानंतर…

Salim Khan on Janmkundali: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान ज्योतिष विद्येला विज्ञान मानतात. मुस्लिम कुटुंबातील असून देखील सलीम खान जन्मकुंडलीवर विश्वास ठेवतात. कारण सलीम खान यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांचा जन्मकुंडलीवर त्याचा विश्वास अधिक दृढ झाला. सलीम खान यांनी मुलगा अरबाज याच्या शोमध्या जन्मकुंडलीबद्दल मोठा खुलासा केला. सलीम यांच्या जन्मकुंडलीत सांगितलं होतं की, त्यांच्या दोन पत्नी आणि 5 मुलं असतील. अशा 4 घटना जन्मकुंडलीनुसार झाल्यानंतर सलीम खान यांचा विश्वास बसला…

शोमध्ये अरबाज खान याने वडिलांना विचारलं होतं की, ‘बाबा तुम्ही नशिबाला मानता. तुमच्या आयुष्यात असं काही झालं आहे ज्यामुळे तुम्ही नियतीवर विश्वास ठेवता?’ यावर सलीम खान म्हणाले, ‘मी कधीच कोणत्याच गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत अशा काही घटना घडतील हे बिलकूल शक्य नव्हतं. तेव्हा विश्वास पटला ज्योतिष शास्त्र विज्ञान आहे…’

पुढे सलीम खान पहिली घटना सांगत म्हणाले, ‘माझ्या वडिलांचा कार अपघात झाला होता. अपघातात त्यांचा खांदा तुटला. त्यांना कुंडलीची फार आवड होती. अपघात झाल्यानंतर तीन – चार दिवसांमध्ये त्यांना कुंडली असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या कुंडलीमध्ये अपघाताची घटना लिहिली होती. त्यांनी कुंडली वाचणाऱ्याला बोलावलं…’

‘कुंडली वाचणाऱ्याने सांगितलं, आयुष्याच्या या टप्प्यावर अपघात होईल. उजवा हात किंवा पायाची हड्डी तुटण्याची शक्यता आहे आणि तसं झालं देखील… ही गोष्ट माझ्या मनात बसली. तेव्हा पासून मी देखील कुंडली जाणून घ्यायला लागलो. मी कुंडली दाखवायला लागलो मला त्यामधील थोडंफार कळू देखील लागलं होतं.’

‘मला सांगितलं तुमची दोन लग्न होतील. तेव्हा मी म्हणालो मी अद्याप एका लग्नासाठी तयार नाही. कुंडली वाचणाऱ्याने सांगितलं, तुमची कुंडली सांगत आहे. मी नाही सांगत. माझी पाच मुलं असतील असं देखील कुंडलीमध्ये सांगण्यात आलं होतं. याच कारणांमुळे माझा कुंडलीवर असलेला विश्वास दिवसागणिक वाढत राहिला.’

सांगायचं झालं तर, सलीम खान यांचं पहिलं लग्न सलमा खान यांच्यासोबत झालं. सलमान खान, अरबाज खान, सोहैल खान आणि अलविरा खान… ही चार मुलं सलीम आणि सलमा यांची आहेत. सलीम खान यांनी दुसरं लग्न हेलन यांच्यासोबत केलं. त्यानंतर अशी परिस्थिती आली जेव्हा सलीम खान यांनी अर्पिता खान हिला दत्तक घेतलं…

सलीम खान यांचं करियर

पुढे सलीम खान म्हणाले, ‘माझ्या कुंडलीत असं देखील लिहिलं होतं की, लोकप्रिय सेलिब्रिटी माझ्याकडे काम मागण्यासाठी येतील. पण मी दिग्दर्शक, निर्माता नव्हतो तर मी लेखक होते… असं असताना लोकं माझ्याकडे काम मागायला का येतील? असा प्रश्न मझ्या मनात उपस्थित झाला. पण कालांतराने अनेक माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे माझ्यासाठी काहीतरी लिहा…’ असं देखील सलीम खान म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;