फेक कागदपत्रांवर ऍडमिशन, हिंदुस्थानी विद्यार्थ्याच्या फसवणुकीनंतर अमेरिकन विद्यापीठ अलर्ट मोडवर
आर्यन आनंद या हिंदुस्थानी विद्यार्थ्याने नकली कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथील लेहाई विद्यापीठात प्रवेश मिळवल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस झाले. एवढेच नव्हे तर आर्यन आनंदने ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लेहाई विद्यापीठाची कशी फसवणूक केली याची माहिती देणारी पोस्ट लिहिली. लेहाई युनिव्हर्सिटीपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यावर आर्यन आनंदचे ऍडमिशन रद्द करण्यात आले. या घटनेपासून लेहाई युनिव्हर्सिटी अलर्ट मोडवर आली आहे. युनिव्हर्सिटीने प्रत्येक विदेशी विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
लेहाई युनिव्हर्सिटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आलीय. त्यासाठी थर्ड पार्टी कंपनीचीही मदत घेतली जाणार आहे. हिंदुस्थानी विद्यार्थ्याने केलेल्या फसवणुकीमुळे खूप दुःखी आणि त्रस्त झाल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे प्रकरण ?
लेहाई युनिव्हर्सिटीच्या अधिकारी डॉ. सबरिना जेडलिका म्हणाल्या, ज्या विद्यार्थ्याला आम्ही खूप सावधगिरीने निवडले होते, त्याने नकली कागदपत्रे देऊन प्रवेश मिळवला याचे दुःख जास्त आहे. आपल्या योग्यतेनुसार उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला पाहिजे, फसवणूक करून नव्हे, असे त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List