कर्नाटकात सायबर चोरांचा 2047 कोटींचा चुना

कर्नाटकात सायबर चोरांचा 2047 कोटींचा चुना

हिंदुस्थानची  आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूत सायबर चोरटय़ांनी अनेकांना गंडा घातला आहे. 11 महिन्यांत कर्नाटकात सायबर गुन्हेगारांनी 20,875 लोकांना आपल्या जाळ्यात फसवून तब्बल 2047 कोटी 20 लाख रुपयांवर डल्ला टाकला. याशिवाय मागील सहा वर्षांत घोटाळेबाजांनी अनेकांची एकूण 3,595 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केली.

डिजिटल अरेस्ट, फिडेक्स स्कॅम अशी काही सायबर चोरांची नवीन शस्त्रे आहेत. फोनद्वारे भीतिदायक माहिती सांगणे, अल्पशिक्षित यांना विविध आमिषे दाखवणे, ओटीपी, पासवर्डची मागणी असा कट रचून फसवणूक केली जाते. या भामटय़ांच्या बोलण्यात निष्पाप लोक अडकतात. कर्नाटकात सायबर दरोडेखोर नागरिकांकडून दर तासाला सात लाख रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. लोकांना पोलिसांकडून कोणतीही गोपनीय माहिती न देण्याचा सल्ला दिला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;