“आराम किती वेळ करता?”,सैफने विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे उत्तर ऐकून सर्वांनी हातच जोडले

“आराम किती वेळ करता?”,सैफने विचारलेल्या प्रश्नावर मोदींचे उत्तर ऐकून सर्वांनी हातच जोडले

नुकतीच संपूर्ण कपूर कुटुंबाने तसेच सैफ अली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो सर्वत्र खूप व्हायरल झाले. त्यातील बऱ्याच चर्चा आणि किस्सेही व्हायरल झाले आहेत. मोदींनी या कुटुंबासोबत बऱ्याच विषयांवर चर्चा केली. तसेच कपूर कुटूंबातील सदस्यांनी, सैफने मौदींना अनेक प्रश्न विचारले. मोदींनी देखील त्यांच्या प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

मोदींनी दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना आश्चर्य 

राज कुपर यांच्या 100 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोदींसोबत झालेल्या या भेटीबद्दल सैफने बरीच माहिती दिली तसेच फोटोही शेअर केले. दरम्यान मोदींसोबतच्या संवादा दरम्यान सैफने त्यांना एक प्रश्न विचारला होता. त्यावर मोदींनी जे उत्तर दिले ते ऐकून सर्वांना एवढं आश्चर्य वाटलं की सर्वांनी थेट हातच जोडले.

“तुम्ही किती वेळ आराम करता…”

सैफने तो किस्सा सांगितला आहे ,तो म्हणाला ” मोदी हे संसदेमधील कामकाज संपल्यानंतर आले होते. त्यामुळे ते थकलेले असतील असं मला वाटत होतं. मात्र ते आमच्याकडे पाहून छान हासले. ते फार उत्साही वाटले,तेव्हा मी मोदींना पश्न विचारला की तुम्ही किती वेळ आराम करता? असं सैफने मोदींबद्दल बोलताना सांगितलं.

पुढे सैफ म्हणाला “माझ्या मते देश चालवण्यासाठी ते (पंतप्रधान मोदी) फार कष्ट घेत आहेत. एवढं असतानाही ते अशाप्रकारच्या भेटींसाठी वेळ काढतात हे कौतुकास्पद आहे. तुम्ही किती वेळ आराम करता असं मी त्यांना विचरला. त्यावर त्यांनी रात्री तीन तास आराम करतो असं सांगितलं.उत्तर ऐकून आम्ही सर्वजन आश्चर्यचकित झालो” हा किस्सा सांगत सैफसोबत सर्वांनाच मोदींचे कौतुक आणि आश्चर्य वाटले. मोदींचं उत्तर ऐकून थक्क झाल्याचं सैफच्या हावभावावरुन दिसत होतं. तसेच सर्वांनी त्यांना सन्मानाने हात जोडून नमस्कारही केला.

पतौडी कुटुंबाबद्दल विचारलं तसेत तैमुर, जहांगीरसाठी घेतली सही

सैफने पंतप्रधान मोदींनी आपल्याबरोबर बोलताना आई शर्मिला टागोर आणि दिवंगत वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याबद्दलही गप्पा मारल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी सैफच्या पालकांबद्दलही चौकशी केली. तसेच करीना आणि सैफने तैमुर आणि जहांगीरसाठी स्वाक्षरी घेतली.

मोदींचे आभार मानले

दरम्यान पंतप्रधान मोंदीच्या भेटीनंतर सर्वच कपूर आणि पतौडी कुटंबाने आनंद व्यक्त करत ते क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच मोदींनी त्यांचा एवढा अमुल्य वेळ दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनापासून आभारही मानले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;