चिपळूणमध्ये वाढीव घरपट्टीबाबत अर्ज करणाऱ्यांचा पुन्हा सर्व्हे होणार, दंड लागणार नाही; शिवसेनेला मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

चिपळूणमध्ये वाढीव घरपट्टीबाबत अर्ज करणाऱ्यांचा पुन्हा सर्व्हे होणार, दंड लागणार नाही; शिवसेनेला मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

चिपळूण शहराची वाढीव घरपट्टीबाबत सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळ मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. सुमारे पाऊण तास सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत अनेक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले की, ज्या नागरिकांना घरपट्टी वाढली असे म्हणणे असेल त्यांनी 28 डिसेंबर 2024 पर्यंत नगर परिषद येथे रीतसर अर्ज करावे.

जे नागरिक असा अर्ज करतील त्याचा पुन्हा सर्व्हे होणार. मगच ती कायम होणार. या वेळेत कोणताही दंड लागणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी विधानसभा प्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख विनोड झगडे, शहर प्रमुख शशिकांत मोदी,शहर सचिव प्रशांत मूळये ,संघटक वैशाली शिंदे, युवा शहर संघटक पार्थ जागूस्टे सर्व उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;