Mumbai Hit & Run : भरधाव दुचाकीची जेष्ठ नागरिकाला धडक, अपघातात वृद्ध गंभीर जखमी
मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीने जेष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिल्याची घटना अंधेरीत घडली आहे. या अपघातात 78 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाली आहे. मांगीलाल कोठारी असे जखमी वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी विले पार्ले पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरीतील कोल डोंगरी परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने कोठारी यांना धडक दिली. या धडकेत कोठारी यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. कोठारी यांना तात्काळ जीवन विकास रुग्णालयात नेण्यात आले आहे. नंतर त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात रेफर करण्यात आले.
कोठारी यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून विले पार्ले पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List