अभिनेते जितेंद्र बोहल्यावर, गळ्यात वरमाळा टाकली अन्… 50 व्या वाढदिवशीच काय घडलं?

अभिनेते जितेंद्र बोहल्यावर, गळ्यात वरमाळा टाकली अन्… 50 व्या वाढदिवशीच काय घडलं?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनी आज पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 50 वर्षांपूर्वी त्यांनी शोभा कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांचं 16 डिसेंबर 1974 ला लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाचा आज 50 वा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या या गोल्डन जुबलीच्या निमित्ताने जितेंद्र आणि शोभा यांनी पुन्हा एकदा एकमेकांसोबत लगीनगाठ बांधली आहे. जितेंद्र यांचे मुलगा तुषार कपूर आणि मुलगी एकता कपूर यांनीच आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या 50 व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्न करण्याची आयडिया दिली होती. ही आयडिया त्यांनी सत्यात साकारली. विशेष म्हणजे संपूर्ण बॉलिवूड या सोहळ्याला हजर राहिलं. मेहंदी, संगीत, वरमाला या सर्व रितीरिवाजांना फॉलो करत जितेंद्र आणि शोभा कपूर यांनी पुन्हा एकदा विवाह केला.

जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या भव्य लग्न सोहळ्याला त्यांचे चित्रपटसृष्टीतील अनेक मित्र सहभागी झाले. यामध्ये अभिनेता अनिल कपूर, राकेश रोशन, प्रेम चोप्रा यांचा समावेश होता. फक्त बॉलिवूड नाही तर रुचिरा कपूर, अनीता हसनंदानी, क्रिस्टल डिसूजा, नीलम कोठारी, रिद्धी डोगरा, समीर सोनी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

जितेंद्र यांच्या गाण्यांवर अनेकांचा ठेका

जितेंद्र आणि शोभा कपूर यांच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात एकता कपूर हिच्यासोबत रिद्धी डोगरा आणि क्रिस्टल डिसूजा यांनी जितेंद्रच्या गाजलेल्या अनेक गाण्यांवर ठेका धरला. या कार्यक्रमात अभिनेता समीर सोनी याने जितेंद्र बनत अनेक मुलींसोबत डान्स केला. विशेष म्हणजे नवरदेव-नवरीने एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर केक कापूनही सेलिब्रेशन झालं

आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकता कपूर हिने खास हॅशटॅग बनवला होता. त्यांचे अनेक मित्र ‘शोभा जीत गयी’ असं लिहून जितेंद्र आणि शोभा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. या हॅशटॅगमध्ये शोभा आणि जितेंद्र या दोघांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

जितेंद्र आणि शोभा यांची रंजक प्रेम कहाणी

जितेंद्र आणि शोभा कपूर यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. जितेंद्र हे 21 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा शोभा सिप्पी यांना पाहिलं होतं. शोभा त्यावेळी केवळ 14 वर्षांच्या होत्या. दोघांसाठी खरंतर त्यावेळी ते पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. पण त्यांच्या मनातलं प्रेम ओठांवर येऊ शकलं नव्हतं. त्यानंतर दोन्ही जण आपल्या आयुष्यात पुढे गेले. यानंतर मग जितेंद्र यांचं नाव हेमा मालिनी यांच्यासोबत जोडलं गेलं. कुटुंबाच्या दबावामुळे दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं देखील होतं. पण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या मदतीसाठी आले होते. दोघांचं लग्न मोडलं आणि शेवटी 31 व्या वर्षी जितेंद्र यांनी शोभा कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;