Ratnagiri News – हर्णे बंदरातून तब्बल 47 लाख रुपयांचा डिझेल सदृष्य पदार्थ जप्त; दापोली पोलीसांची यशस्वी कामगिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे 30 हजार लिटर डिझेल सदृश्य द्रवपदार्थ नौकेसह जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुमारे 47 लाख 62 हजार 500 रुपयांचा असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णे बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी रविवारी (ता.15) रोजी सायंकाळी 5 वाजता हर्णे बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका आढळून आली, या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या 14 खणांमध्ये सुमारे 30 हजार लिटर डिझेल सदृश्य द्रवपदार्थ आढळून आला. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला. या प्रकरणी संशयित वामन पोशिराम रघुवीर, दर्शन अनंत कोळी, संदीपकुमार मिठाईलाल मिसाद आणि शिव्य प्रमोद मिसाद यांच्याविरोधात विनापरवाना डिझेल सारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल अशा रीतीने हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपधीक्षक आवटी, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेड कॉनस्टेबल सडकर, पंकज पवार, विकास पवार, सुहास पाटील, सुरज मोरे सहभागी झाले होते. सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 287, 3(5) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List