समारंभाहून परतत असताना कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 7 जण गंभीर जखमी

समारंभाहून परतत असताना कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 7 जण गंभीर जखमी

समारंभाहून घरी परतत असताना कारची ट्रकसोबत जोरदार टक्कर होऊन अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. मृतांमध्ये एक लहान मूल, 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

कारमध्ये एकूण 13 जण होते. सर्वजण नातेवाईकाच्या घरी एका समारंभासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना कार आणि ट्रकची धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना आधी डौंडी येथे नेण्यात आले, त्यानंतर हायर सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;