भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांना कोर्टाचा दणका, 20 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांना कोर्टाचा दणका, 20 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने फौजदारी मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यांना 20 डिसेंबरला कोर्टामध्ये प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आम आदमी पक्षाचे नेता, माजी मंत्री आणि आमदार सत्येंद्र जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने बन्सुरी स्वराज यांना फौजदारी मानहानीची नोटीस बजावली आहे.

सत्येंद्र जैन यांनी बन्सुरी स्वराज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, बन्सुरी स्वराज यांनी 5 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीदरम्यान सत्येंद्र जैन यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. ही मुलाखत देशातील लाखो लोकांनी पाहिली होती. माझ्या घरातून 3 कोटी रुपयांची रोकड, 1.8 किलोग्राम सोने आणि सोन्याची 133 नाणी जप्त करण्यात आली आहेत, असा खोटा दावा बन्सुरी स्वराज यांनी केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला आहे. या मुलाखतीवरून सत्येंद्र जैन यांनी आरोप केला आहे की, बन्सुरी स्वराज यांनी मुद्दाम मला बदनाम करण्यासाठी आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी अशा पद्धतीची टिप्पणी केली आहे. त्यामुळे सत्येंद्र जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बन्सुरी स्वराज यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची नोटीस बजावली असून 20 डिसेंबरला प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;