मला डावललं काय, फेकलं काय; छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया

मला डावललं काय, फेकलं काय; छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून तब्बल 23 दिवसानंतर रविवारी राज्यातील 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली. यंदाच्या मंत्रीमंडळातून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा जुन्या बारा खोडांना डच्चू देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

”मी नाराज आहे, दादांसोबत कालपासून चर्चा केलेली नाही. मला ते गरजेचं वाटत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता… मला डावललं काय, फेकलं काय काय फरक पडतो. पण अशी किती मंत्रीपदं आली आणि गेली पण छगन भुजबळ संपलेला नाही’, अशी प्रतिक्रीया छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान नाराज भुजबळ हे नागपूरहून नाशिकला निघणार असल्याचे समजते. त्यामुळे भुजबळ अधिवेशनात सामील होणार नसल्याचे समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;