झाकीर हुसेन यांचं तबलावादन संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, आदित्य ठाकरे यांची झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली
जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उस्ताद झाकीर हुसेन ह्यांच्या निधनाचं वृत्त मनाला वेदना देणारं आहे.
त्यांचं तबलावादन हा संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, शास्त्रीय संगीतासाठी संजीवनी होता.
हा अविष्कार प्रत्येक कलारसिक आपल्या हृदयात सदैव जपून ठेवेल!सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक उस्ताद झाकीर हुसेन… pic.twitter.com/emNlIgkiMO
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 16, 2024
”उस्ताद झाकीर हुसेन ह्यांच्या निधनाचं वृत्त मनाला वेदना देणारं आहे. त्यांचं तबलावादन हा संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, शास्त्रीय संगीतासाठी संजीवनी होता. हा अविष्कार प्रत्येक कलारसिक आपल्या हृदयात सदैव जपून ठेवेल! सुप्रसिद्ध तबलावादक, संगीत दिग्दर्शक उस्ताद झाकीर हुसेन ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List