विवाहित मित्रांकडून असे कमेंट्स, स्टॉकरने दिला त्रास; ‘तारक मेहता..’ फेम ‘बबिताजी’ची तक्रार
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. मुनमुनचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.
मुनमुनच्या सौंदर्यावर केवळ 'तारक मेहता..'मधील जेठालालच नाही तर असंख्य चाहते फिदा आहेत. सौंदर्यामुळे मुनमुन यांची अनेकांकडून प्रशंसा होते. एका मुलाखतीत मुनमुन यांनी याबद्दलचाच एक किस्सा सांगितला.
मुनमुनने सांगितलं की तिचे मित्र तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक करतात. इतकंच नव्हे तर काहीजण तिच्यावर क्रश असल्याचीही कबुली देतात.
मुनमुन म्हणाली, "कोणत्या महिलेला कौतुक आवडत नाही? अर्थात मलासुद्धा माझी प्रशंसा केलेली आवडते. माझे काही मित्र विवाहित आहेत, तरीसुद्धा ते खुलेपणाने म्हणतात की मला तुझ्यावर क्रश आहे."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List