सोयाबीन, धानाला भाव नाही; शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

सोयाबीन, धानाला भाव नाही; शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन असताना, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे.

एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे, सोयाबीन, धान कापसाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत, पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे. त्यामुळेच शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. यानंतर आंबेडकरी जनतेने आंदोलनं केले पण त्यातही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याना मारहाण झाली, धरपकड करण्यात आली. त्यातही एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, हे संतापजनक आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. ह्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, महेश सावंत, ज. मो.अभ्यंकर हे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला महाविकास आघडीच्या नेत्यांनी संबोधन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;