सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने लावले ‘जय श्री राम’चे नारे, म्हणाला, ‘पापा को फोन करो…’

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने लावले ‘जय श्री राम’चे नारे, म्हणाला, ‘पापा को फोन करो…’

Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सैफ याची कार्बन कॉपी म्हणून देखील इब्राहिम याची ओळख आहे. इब्राहिम दिसताच त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी जमते. पण शनिवारी इब्राहिम याचा वेगळा अंदाज चाहत्यांच्या समोर आला. सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इब्राहिम ‘जय श्री राम’चे नारे देताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिम कारमध्ये बसलेला दिसत. तेव्हा पैसे मागण्यासाठी काही गरजू लोकं इब्राहिमच्या भोवती जमा होतात. तेव्हा एक गरजू व्यक्ती इब्राहिमला म्हणतो, ‘5 रुपयांनी काय होतं?’ यावर इब्राहिम म्हणतो, ‘काय यार आता… 5 रुपयांनी काही होणार नाही, पण व्हायला देखील पाहिजे… माझ्या वडिलांना फोन करा… जय श्री राम…’ असं इब्राहिम म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी इब्राहिमला म्हणाला, ‘बडे दिलवाला…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर वेगळाच आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘जय श्री राम… भाईने दिल जीत लिया…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना इब्राहिम कौतुक केलं तर अनेकांनी इब्राहिमला ट्रोल देखील केलं.

इब्राहिम अली खान याचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच ‘सरजमीन’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बोमन ईराणी यांच्यावर आहे. सिनेमात इब्राहिम याच्यासोबत अभिनेत्री काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील इब्राहिमच्या पहिल्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

इब्राहिम अली खान – पलक तिवारी

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत… अशा चर्चा कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
इब्राहिम अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यावर पलक हिने स्वतःची भूमिका देखील मांडली. आम्ही चांगले मित्र आहोत असं अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती. पलक सध्या बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;