शक्ती कपूर थोडक्यात बचावले नाहीतर… पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

शक्ती कपूर थोडक्यात बचावले नाहीतर… पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

Bollywood Actor Shakti Kapoor: विनोदी कलाकार सुनील पाल आणि मुश्ताक खान यांच्या अपहरणकर्त्यांच्या निशाण्यावर बॉलीवूडचे खलनायक शक्ती कपूर देखील होते. शक्ती कपूर यांचं देखील अपहरण करण्याच्या विचारात अपहरकर्ते होते… अशी माहिती पोलिसांनी दिली. पण शक्ती कपूर थोडक्यात बचावले. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, ‘सेलिब्रिटींना कार्यक्रमाचं कारण देत बोलवायचे. त्यानंतर त्यांचं अपहरण करून त्यांच्याकडून वसुली करायचे…’

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी सुनील पाल आणि मुश्ताक यांच्याकडून पैसे घेतले. तर अभिनेता राजेश पूरी याला बोलावून त्याच्यासोबत सेल्फी घेतली आणि अभिनेत्याला सोडून दिलं. सांगायचं झालं तर, सुनील पाल आणि मुश्ताक यांचं अपहरण झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor)

 

अरुण बख्शी दिल्लीत बोलावून केली वसूली

अपहरकर्त्यांनी अरुण बख्शी यांना दिल्लीत बोलावलं त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सोडून दिलं. शनिवारी अभिनेते मुश्ताक खान बिजनौरला पोहोचले आणि त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला. मुश्ताक खान यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपहरण करून त्यांना बिजनौरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या मोबाईलमधून 2.20 लाख रुपये अपहरकर्त्यांनी घेतले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor)

 

मुश्ताक यांचे मॅनेजर शिवम यादवने कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पोलिस लाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एसपी अभिषेक झा यांनी सांगितले की, अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातील टोळीतील सराईत गुन्हेगारासह एकूण दहा गुन्हेगार आहेत.

यापैकी माजी नगरसेवक सार्थक चौधरी उर्फ ​​रिकी, सबीउद्दीन उर्फ ​​सायबी, अझीम आणि शशांक या चार हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. अर्जुन कर्नावाल नावाचा एक आरोपी मेरठ पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींकडून एक लाख चार हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या लवी पालसह पाच अद्याप आरोपी फरार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;