घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान नाही; सत्तार, केसरकर, सावंत यांचा पत्ता कट

घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान नाही; सत्तार, केसरकर, सावंत यांचा पत्ता कट

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची नावे नाहीत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे. घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान दिले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 12 डिसेंबर रोजी दिल्लीत मंत्रि‍पदाची यादी फायनल झाल्याचे सांगीतले जाते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळाले यापेक्षा कोणाला डच्चू मिळाला, याची चर्चा राजकीय वर्तिळात रंगत आहे. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या मंत्रिमंडळाच्या यादीत नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी शुक्रवारी सावंत आणि केसरकर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री त्यांना शिंदे यांनी भेट दिली. तेव्हाच त्यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट झाले होते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;