भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच – आदित्य ठाकरे

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच – आदित्य ठाकरे

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ते मतदारांचा वापर ‘यूज अँड थ्रो’ असा करतात. त्यामुळे ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आल्यानंतर लगेचच मंदिरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केल्याचे सांगत मंदिरांना खरा धोका भाजपपासूनच असल्याचा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांवर याल तर याद राखा, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

आपल्या मंदिरांचे रक्षण करताना दुसऱ्या कोणत्याही धर्माबद्दल द्वेष पसरवण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अनेक मंदिरे वाचल्याचे त्या त्या ठिकाणचे पुजारी, विश्वस्त अजूनही अभिमानाने सांगत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आता दादरचे हनुमान मंदिर वाचल्यामुळे शिवसेनेची ताकद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा एकदा दिसून आल्याचे सांगतानाच यावेळी केवळ निवडणुकांपुरते हिंदुत्व दाखवणाऱ्या भाजपच्या कारस्थानांची पोलखोलही त्यांनी केली.

मी वाराणसी दौऱ्यावर गेलो तेव्हा भाजपने कॉरिडोरच्या नावाखाली मंदिरे, प्राचीन मूर्ती तोडल्याची माहिती तेथील पुरोहिताने दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेमुळे दादरचे मंदिर वाचले असताना भाजपने आज दिवसभर केवळ नाटकं केली, असा टोलाही त्यांनी लगावला. हनुमानाने ठरवले तर निवडणुका बॅलेटवर होतील आणि देशाचा खरा आवाज काय आहे हे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली! – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मंदिर वाचवण्याच्या भूमिकेमुळेच दादरचे हनुमान मंदिर वाचल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. आज शनिवारी हनुमानाच्या दिवशीच जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली, असा आवाज घुमल्याचे ते म्हणाले. गेल्या 50 ते 60 वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील मंदिरांचे रक्षण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही शिवसेना हे काम करीत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नौटंकीबाज सोमय्यांना मंदिराबाहेर काढा!

शिवसेना मंदिर वाचवण्यासाठी आक्रमक झाल्यामुळे खडबडून जाग आल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी मंदिरात येऊन मारुतीरायासमोर नतमस्तक होत आरती केली. यामध्ये किरीट सोमय्या हेदेखील मंदिरात आल्याने शिवसैनिक संतापले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नौटंकीबाज सोमय्यांना मंदिराबाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहताच सोमय्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;