ठेच्याची चव लय भारी, जान्हवी कपूरच्या तोंडात पाणी, रेसिपी जाणून घ्या

ठेच्याची चव लय भारी, जान्हवी कपूरच्या तोंडात पाणी, रेसिपी जाणून घ्या

तुम्हाला ठेचा आवडतो का? असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणाल, ‘सगळं सोडा आणि ठेचा भाकरी द्या,’ त्याची चवच न्यारी. अहो मोठमोठ्या स्टार्सनाही ठेचाचे वेड आहे. ठेचा पाहिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. जान्हवीने एका मुलाखतीत आपल्या ठेच्याचं कौतुक केलं आहे.

जान्हवी कपूरची आवडती कविता

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anima Painuly (@animapainuly)

 

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ठेचा बनवण्यासाठी खूप कमी घटकांची आवश्यकता असते. ही एक साईड डिश असूनही चवीमुळे कधीच बाजूला राहू शकत नाही. लोकांना त्याची तिखट चव आवडते. भाकरी, भात किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत ठेचा खाता येतो. त्याची चव चाखायची असेल तर आता सोपी रेसिपीही जाणून घ्या.

ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते?

8 ते 10 ताज्या हिरव्या मिरच्या
2 टेबलस्पून शेंगदाणा तेल
लसणाच्या 6-8 पाकळ्या
3 टेबलस्पून शेंगदाणे
1/2 टीस्पून कोथिंबीर
1/2 टीस्पून जिरे
मूठभर कोथिंबिरीची पाने
मीठ चवीनुसार

ठेचा बनवण्याची पहिली पायरी

सर्वप्रथम एका कढईत शेंगदाण्याचे तेल गरम करावे लागेल. आता त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालून मंद आचेवर एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यात जिरे, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सुगंध येईपर्यंत चांगले परतून घ्यावे. लक्षात ठेवा की आपल्याला सर्व काही हलके तळायचे आहे, जास्त शिजवू नका.

शेवटची पायरी

भाजल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यात हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. पेस्टल किंवा फूड प्रोसेसरमध्ये सर्व काही बारीक करून घ्या. बारीक करून तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता.

ठेचा बनवण्याची अगदी सोपी पद्धत

हिरव्या मिरच्या आणि लसण हे दोन्ही थोडं तेल टाकून भाजून घ्या आणि खलबत्त्यात कुटा. झाला ठेचा. लक्षात घ्या की, मिक्सरमुळे मुळ चव जाते आणि ठेच्याची चव चाखायची तर त्यात फार गोष्टी घालत बसू नका. फक्त मिरची, लसून आणि मीठ इतकंच पुरेसं आहे.

ठेच्याची चव भल्याभल्यांना आवडते. ग्रामीण भागात अगदी साधा आणि चविष्ट ठेचा बनवतात. विशेष म्हणजे चुलीवर भाजलेल्या मिरच्यांचा ठेचाच वेगळा असतो. त्याची चव दुसरीकडे कुठेही नाही. कारण, चुलीवरच्या भाकरीची आणि ठेचाची चवच वेगळी आहे. तुम्हालाही जमल्यास तुम्ही एकदा ठेचा नक्की खावून पाहा. तुम्ही ठेचा खाल्ल्यास तो तुम्हाला पुन्हा पुन्हा खावा वाटेल. ठेचा आणि भाकरी इतकंच अनेकांना पुरेसं असतं. त्याची चवी जगात कुठेही नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;