आरोग्य विभागाकडून हेळसांड; कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत फरशीवर झोपवलं
On
आरोग्य विभागाकडून रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उघडकीस आला आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीमध्ये फरशीवर झोपवण्यात आल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने महिलांना फरशीवर झोपवण्यात आले असून याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List