कल्याण-कसारा दरम्यान तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे 30-40 मिनिटं उशिरा, चाकरमान्यांना लेटमार्क
आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच आहे. शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-कसारादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल तब्बल 45 मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना लेटमार्क लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान विद्यूत पुरवठा खंडीत झाला. यामुळे लोकलसेवेचा बोजवारा उडाला. लोकल तब्बल 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत असून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे.

लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच लोकस सेवा सुरू झाल्यानंतरही गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने वेळेत कार्यालयात पोहोचता आले नाही आणि लेटमार्क लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List