Mumbai crime news – ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाखाली काळाबाजार; वांद्रे येथील दोन दुकानांवर पोलिसांचा छापा

Mumbai crime news –  ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाखाली काळाबाजार; वांद्रे येथील दोन दुकानांवर पोलिसांचा छापा

टॉमी हिलफिगर, पॅलविन क्लेन आणि झारा या नामांकित कंपनीच्या नावाने हलक्या दर्जाचे कपडे विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱया वांद्रय़ाच्या हिल रोड परिसरातील दोन दुकानांवर आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने कारवाई केली.  त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 19 हजार किमतीचे हलक्या दर्जाचे कपडे हस्तगत केले.

वांद्रय़ाच्या हिल रोडवर असलेल्या द हॅप आणि पॅन्डी या दोन दुकानांमध्ये  नामांकित पंपनीच्या नावाने हलक्या दर्जाच्या कपडय़ांची विक्री केली जात असल्याची तक्रार आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेकडे आली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार महेश नाईक, चंद्रकांत वलेकर, विशाल यादव व पथकाने गुरुवारी त्या दोन्ही दुकानांवर एकाच वेळी छापा टाकला. नामांकित पंपनीच्या नावाने टी शर्ट, शर्ट आदी हलक्या दर्जाचे कपडे विकत असल्याचे आढळून आले.

काळाबाजार करणारे अक्षय छाब्रिया (35) आणि किशोर मयांक (59) या दोघांविरोधात कॉपीराईट अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्या दुकानातील दहा लाख 19 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी त्यांना वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;