विजय क्लब, शिवशक्ती अजिंक्य

विजय क्लब, शिवशक्ती अजिंक्य

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्टस् क्लबचा 35-30 असा पराभव करीत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली, तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व्ह बँक स्पोर्टस् क्लबचा 34-32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस) कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना.म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात आज कबड्डीप्रेमींना ठरावीक सामन्यांचा मनमुराद आनंद लुटता आला. महिलांच्या गटात बलाढय़ शिवशक्ती महिला संघाला जेतेपद पटकावताना डॉक्टर शिरोडकर स्पोर्टस् क्लबशी कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला शिवशक्तीकडे 20-16 अशी चार गुणांची आघाडी होती. दुसऱया सत्रात शिरोडकरच्या चढाईपटूंनी जोरदार संघर्ष करत शिवशक्तीशी बरोबरी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र ते थोडक्यात अपयशी पडले आणि शिवशक्तीने 35-30 असा विजय मिळवत आपल्या जेतेपदाची मालिका कायम राखली.

शिरोडकरच्या मेघा कदमला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा, तर शिवशक्तीच्या पौर्णिमा झेंडे आणि प्रतीक्षा तांडेल यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पकडपटू आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

व्यावसायिक गटात स्वामी समर्थ आणि रिझर्व बँक स्पोर्टस् क्लब यांच्यातला अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. या लढतीत रिझर्व्ह बँक स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मध्यंतराला 13-11 अशी दोन गुणांची आघाडी आपल्याकडे राखली होती. मात्र दुसऱया सत्रात स्वामी समर्थच्या चढाईबहाद्दरांनी वेगवान खेळ करत आधी बरोबरी साधली आणि नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राखत जेतेपदही पटकावले. त्यांनी हा संघर्ष 34- 32 असा जिंकला. स्वामी समर्थचा यश चोरगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

पुरुषांच्या स्थानिक गटात मात्र विजय क्लब आणि जय भारत क्रीडा संघात झालेला अंतिम सामना अत्यंत एकतर्फी झाला. विजय क्लबच्या खेळाडूंनी प्रारंभीच पल्लेदार चढाई करत 17-5 अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले. दुसऱया सत्रातही जय भारतच्या खेळाडूंचे काहीही चालू शकले नाही. परिणामतः विजय क्लबने ही लढाई 27-13 अशी सहज जिंकली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि आमदार सचिन अहिर, आमदार महेश सावंत, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;