नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली; शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार

नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली; शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी महायुती सरकारची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. पण सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे.

महायुती सरकारचे नागपूरमधील पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे पहिल्याच अधिवेनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. 2019मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती. त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल, अशी शेतकऱयांची अटकळ होती.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याने कर्जमाफी होणार नाही.

सहकार विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता कर्जमाफी देण्यासाठी तयारीबाबत कोणतेही निर्देश अद्याप नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहा लाख शेतकऱ्यांना लाभ नाही

2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱयांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतही लाभ मिळू शकला नाही. यामध्ये 1 हजार 644 कोटी रुपयांची कर्जमाफी तर 3 हजार 985 कोटी रुपयांची एकरकमी परतफेड योजना आणि 346 कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रलंबित आहे.

2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेत 1 एप्रिल 2001 पासून पीक व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या आणि 30 जून 2016 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आणली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली. तसेच 2015-16, 2016-17 या आर्थिक वर्षात पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱयांना 25 हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. या योजनेंतर्गत 18 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;