पुण्यात सोफा फॅक्टरीला भीषण आग, एक कामगार होरपळला
पुण्यात सोफा फॅक्टरीला भीषण आग लागून एक कामगार होरपळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पुण्याच्या येवलेवाडी परिसरात दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हरून अहमद खान असे मयत कामगाराचे नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून आग नेमकी कशी लागली याबाबत तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचे काम सुरू असताना छोट्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. आगीत फॅक्टरीचेही मोठे नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझली. आगीत गंभीर भाजलेल्या कामगाराला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List