2023 मध्ये परदेशात 86 हिंदुस्थानींवर हल्ले; सर्वाधिक अमेरिकेत, केंद्राची संसदेत माहिती
2023 मध्ये विविध देशांमध्ये तब्बल 86 हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करण्यात आले किंवा त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिली आहे. यापैकी हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ल्याच्या सर्वाधिक घटना अमेरिकेत घडल्याचे आकडेवारी दर्शवते आहे.
लोकसभेचे खासदार संदीप पाठक यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी ही माहिती दिली.
2021 मध्ये परदेशात हल्ला झालेल्या हिंदुस्थानींची संख्या 29 होती. यानंतर 2022 मध्ये ही संख्या 57 वर पोहोचली. आता 2023 मध्ये या संख्येत आणखी वाढ झाली आहे. 2023 मध्ये ही संख्या 86 इतकी झाली आहे. राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी सादर केलेल्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये 86 हिंदुस्थानी नागरिकांपैकी ज्यांवर हल्ले झाले किंवा त्यांची हत्या झाली अशा लोकांची संख्या अमेरिकेत 12 होती, तर कॅनडा, यूके आणि सौदी अरेबियात प्रत्येकी 10 होती.
‘परदेशातील हिंदुस्थानींची सुरक्षा हे केंद्र सरकारच्या अग्रक्रमांपैकी एक आहे. आम्ही यावर बारकाईनं लक्ष ठेवतो. तसेच अशा घटनांची यजमान देशाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल घेतली जाते. प्रकरणांचा योग्य तपास केला जातो आणि गुन्हेगारांना शिक्षा होते’, असा दावा देखील राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांच्या उत्तरात दरम्यान केला आहे.
हे मुद्दे संबंधित देशांच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकींमध्ये देखील उपस्थित केले जातात असंही मंत्र्यांनी सांगितलं.
सिंग यांनी उत्तरादरम्यान, केंद्राने हिंदुस्थानी नागरिकांना सर्व शक्य कॉन्सुलर सहाय्य देण्यासाठी ‘परदेशात हिंदुस्थान मिशन्स/पोस्ट्समध्ये 24×7 हेल्पलाइन’ स्थापित केली आहे.
दरम्यान, आणखी एका वेगळ्या प्रश्नाच्या उत्तरात, सरकारने संसदेला सांगितलं की 2,16,219 हिंदुस्थानींनी त्यांचं नागरिकत्व सोडलं आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये ही संख्या 2,25,620 होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List