शिर्डीत गांजासह 26 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, शिर्डी पोलिसांची कारवाई; एक ताब्यात

शिर्डीत गांजासह 26 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, शिर्डी पोलिसांची कारवाई; एक ताब्यात

रात्र गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी 14 लाखांचा गांजा, 12 लाखांचे चारचाकी वाहन व मोबाईल असे एकूण 26 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करत गांजामालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले, मंगळवारी (10 डिसेंबर) रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अर्जुन कांबळे (वय – 37, रा. निमगाव कोराळे) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांनी याबाबत फिर्याद दिली.

शिर्डी परिसरात जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकाबंदी केली जाते. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास राहाता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असलेल्या सावळीविहीर फाटा येथे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कार्यदे व पोलीस पथकाने नाकाबंदी केली होती. त्यावेळी रात्री साडेबारा वाजता एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कार (क्र. एमएम 14 बी आर 7871) समृद्धी महामार्गावरून उतरून कोपरगावच्या दिशेने शिडींकडे येत असताना तिची तपासणी करण्यात आली.

कारच्या डिक्कीची तपासणी केली असता, त्यात उग्र वास आल्याने डिक्कीतील पाकिटांची तपासणी केली. 46 पाकिटांत अंदाजे 96 किलो वजनाचा गांजा मिळून आला. सदर गांज्याची किंमत अंदाजे 14 लाख 43 हजार असून, कारची किंमत अंदाजे 12 लाख व दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कारचालक अर्जुन कांबळे यास ताब्यात घेण्यात आले.

कांबळे याच्याकडे तो गांजा कुठून
आणला? तो कोठे विक्री करणार होता? आणि त्याला आणखी कोणी साथीदार आहे का? याचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड, गणेश घुले, केवल राजपूत, प्रसाद सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;