शाहरुख ‘मन्नत’चे दोन मजले वाढवणार
मागील अनेक वर्षांपासून अभिनेता शाहरुख खान मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मन्नत बंगला आता आणखी भव्य करण्याचा निर्णय शाहरुख आणि गौरी खानने घेतलाय. शाहरुख आणि गौरीने गेल्या महिन्यात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडे एक अर्ज केला. यामध्ये मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले बनवण्याची परवानगी त्यांनी मागितली. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीने नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये या अर्जावर विचार केला. जर शाहरुखला याबाबतची परवानगी मिळाली तर यासाठी येणारा खर्च तब्बल 25 कोटी रुपये आहे.
मन्नत ही एक हेरिटेज वास्तू आहे. 1914 साली हा बंगला बांधला गेला होता. त्यामुळे यात कोणताही मोठा बदल करण्याआधी परवानगी घ्यावी लागते. मन्नत बंगला 2091.38 स्क्वेअर मीटरवर पसरला आहे. आधीच हा सहा मजली बंगला आहे आणि आता आणखी दोन मजले वाढवण्याची शाहरुख आणि गौरीची योजना आहे.
शाहरुख खानने 2001 साली मन्नत बंगला विकत घेतला होता. तेव्हा त्याने 13 कोटी रुपये किंमत मोजली होती. तेव्हा बंगल्याचं नाव विला विएना असं होतं. ‘येस बॉस’ सिनेमावेळीच हा बंगला शाहरुखच्या नजरेत आला होता. मन्नत खरेदी केल्यानंतर गौरीनेच त्याचं इंटिरियर डिझाईन केलं होतं. त्यांनी बंगल्याचं नाव बदलून मन्नत ठेवलं. आज याची किंमत तब्बल 200 कोटी आहे. शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या त्याच्या ‘मुफासा’ या हॉलिवूड सिनेमाची चर्चा आहे. 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ चा हा सिक्केल आहे. ‘मुफासा’ मध्ये शाहरुखचे डबिंगही आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List