ट्रम्प ‘बर्थराईट सिटीजनशीप’ कायदा संपवण्याच्या तयारीत
येत्या 25 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेणारे डोनाल्ड ट्रम्प ‘बर्थराईट सिटीजनशीप’ कायदा संपवण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर यापुढे जन्माने अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. या निर्णयामुळे लाखो हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांचे टेन्शन वाढले आहे.
बर्थराईट सिटीजनशीप म्हणजे अमेरिकेत जन्माला आलेला कुणीही आपोआप अमेरिकेचा नागरिक बनतो. ज्या मुलांचे पालक वैध-अवैध रूपाने अमेरिकेत आले किंवा पर्यटक, विद्यार्थी व्हिसावर आहेत त्यांनाही हा नियम लागू होतो. डोनाल्ड ट्रम्प यांना हा नियम संपवायचा आहे. या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा ट्रम्प समर्थकांचा आरोप आहे. अमेरिकेचे नागरिक होण्यासाठी कठोर मानके असली पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List