देवीचा कौल, आंगणेवाडी जत्रोत्सवाची तारीख ठरली! मालवणात घुमणार ‘जय भराडी, जय जय भराडी’चा जयघोष!!

देवीचा कौल, आंगणेवाडी जत्रोत्सवाची तारीख ठरली! मालवणात घुमणार ‘जय भराडी, जय जय भराडी’चा जयघोष!!

प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. गुरुवारी सकाळी देवाचा कौल घेऊन तारीख निश्चित करण्यात आली. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

मालवणमधील भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात. या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे या जत्रेत सामान्य जनासह राजकिय नेतेमंडळी, कलाकारही उपस्थिती लावतात.

आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच जत्रेचा दिवस ठरविण्यात येतो. गुरुवारी सकाळी देवीचा हुकून घेऊन तारीख निश्चित करण्यात आली. यावेळी जत्रोत्सवाला 10 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून आयुष्याचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली.

आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थांबरोबरच शासनाची सुद्धा या जत्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते.

जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर गुरुवारी 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;