निलंबित पोलिसाने केला वर्गमैत्रिणीचा खून, कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा घेतला शोध

निलंबित पोलिसाने केला वर्गमैत्रिणीचा खून, कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा घेतला शोध

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बेपत्ता महिलेचा अखेर मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आला. याप्रकरणात पोलीसांनी नरेश डाहुले या निलंबित पोलिसाला अटक केली आहे. हा पोलीस चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतून निलंबित झाला होता. मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव अरुणा काकडे ( 37) असे असून ती या पोलिसाची वर्गमैत्रिणी होती. चिमूर येथे ती देवांश जनरल स्टोर्स नामक दुकान चालवायची.

अरुणा काकडे 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. पण त्यानंतर ती परतलीच नाही. यामुळे कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला. यात निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणाचा गळा दाबून हत्या केली. नरेश डाहुलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश असल्याने त्याला वर्षभरापूर्वी निलंबित केले गेले होते. पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;