एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटले, कार थेट ढाब्यात घुसली; तीन गंभीर जखमी

एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटले, कार थेट ढाब्यात घुसली; तीन गंभीर जखमी

एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट ढाब्यात घुसल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात ढाब्यावर जेवण करत असलेले तीन जण गंभीर जखमी झाले. गुजरातमधील छोटा उदयपूरमध्ये मंगळवारी ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छोटा उदयरपूरमध्ये मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक एसयूव्ही कार चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘यू अँड मी चिकन चायनीज’ ढाब्यामध्ये घुसली. यावेळी ढाब्यावर जेवण करत असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;