हाथरसमध्ये भीषण अपघात, कंटेनर आणि मॅजिक वाहनाच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

हाथरसमध्ये भीषण अपघात, कंटेनर आणि मॅजिक वाहनाच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

भरधाव कंटेनरने मॅजिक वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ ही घटना घडली. जखमींना तात्काळ रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मॅजिकमध्ये 20 जण बसले होते. हे सर्व कुमराई गावचे रहिवासी होते. सर्वजण एटा येथे एका कँसरग्रस्त नातेवाईकाला पहाण्यासाठी चालले होते. यादरम्यान बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ भरधाव कंटनेरने मॅजिक वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मॅजिक वाहन उलटून खड्ड्यात पडले. यात सहा जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाहनातून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;