Kurla Bus Accident : सरकारने जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत द्या – वर्षा गायकवाड

Kurla Bus Accident : सरकारने जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत द्या – वर्षा गायकवाड

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस. जी. बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मृतांच्या वारसांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळणारी आहे. ही मदत अत्यंत तुटपंजी असून मृतांच्या वारसांना प्रत्यकी 25 लाख रुपये दिले पाहिजेत, असं खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.

बेस्ट प्रशासन मागील काही वर्षांपासून बसेस चालविण्यासाठी भाडेकरार प्रक्रिया राबवत आहे. याअंतर्गत बसच्या देखभालीपासून ते बसमधील चालक-कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेपर्यंतची सर्व कामे कंत्राटावर नियुक्त कंपन्यांकडून केली जात आहेत. ही प्रणाली लागू झाल्यापासून मुंबईतील बस प्रवाशांनी त्यातील अनेक उणिवा निदर्शनास आणून दिल्या आहेत. या व्यवस्थेत बसेस आणि बस कर्मचाऱ्यांच्या देखभालीवर सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही तसेच कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणही दिले जात नाही. कुर्ला अपघातातील बसही या प्रणालीअंतर्गत येत असून या बसचा चालकही कंत्राटी कर्मचारी आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे भाडेकरार त्वरित रद्द करावेत, अशी मागणी खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;